शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

सैनिक शाळेचा दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 3:22 PM

सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेने दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबा महाली (वाशिम) :  वाशिम तालुक्यातील सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेने दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना प्रत्येकी दोन वृक्षरोपांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले असून, या उपक्रमाला उदंड प्रतिसादही लाभला आहे.राज्य शासन राज्यभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमात सर्व प्रशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय संस्था, शाळा, महाविद्यालयांना स्वतंत्र उद्दिष्ट देण्यात आले आहे. पर्यावरण रक्षण व संवर्धनात आपला वाटा असावा म्हणून खासगी, स्वयंसेवी संस्थांनीही या वृक्ष लागवड अभियानात सहभाग घेतला आहे. वाशिम तालुक्यातील सुपखेला येथील सैनिक शाळेने मात्र पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला असून, या अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून दोन हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव चंद्रकांत ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थी, शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाºयांना प्रत्येकी दोन वृक्षरोपे लावण्याचे आवाहन करण्यात आले असून, या उपक्रमाला शिक्षकांपासून सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाला पालकवर्गाचाही उदंड प्रतिसाद लाभत असल्याने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण होत आहे. यशवंतराव चव्हाण सैनिक शाळेत ८८१ विद्यार्थी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून १०० जण कार्यरत असून, हा उपक्रम तडीस नेण्यास सर्वच परिश्रम घेत आहेत. या उपक्रमासाठी कर्नल पी. पी. ठाकरे, प्राचार्य एम. एस. भोयर, शाळेतील हरीतसेनेच एम. एन. वानखडे, पी. व्ही. गाडेकर, एन. के. भेडे, पी. एस. पाचकोर, शिक्षिका डी. पी. पाटील, तसेच प्रसिद्धी प्रमुख आर. आर. पडवाल सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा