बंजारा समाजाचा इतिहास समाजापुढे ठेवण्यासाठी साहित्य परिषद - श्रीराम महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:54 IST2017-09-14T19:54:25+5:302017-09-14T19:54:34+5:30

बंजारा समाजाचा इतिहास समाजापुढे ठेवण्यासाठी साहित्य परिषद - श्रीराम महाराज
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : नागपुर येथे २८ व २९ आॅक्टोंबरला राष्ट्रीय गोरबंजारा साहित्य परिषदेचे आयोजन केले असुन यात बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास समाजापुढे ठेवणे व समाजाच्या न्याय मागण्या शासन दरबारी पोहोचविण्यासाठी साहित्य परिषद चे आयोजन केले आहे. असे मत नागपुर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव श्रीराम महाराज यांनी व्यक्त केले.
इंदिरा गांधी राष्ट्रीय कन्या शाळा मानोरा येथे समाजाची सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.मोहन चव्हाण होते तर प्रमुख उपस्थितीत प्राचार्य लक्ष्मण राठोड, प्रा.डॉ.प्रकाश राठोड, मनोहर चव्हाण,प्रा.दिलीप चव्हाण, टि.व्ही.राठोड, डॉ.महेंद्र चव्हाण, डॉ.धनंजय राठोड, प्रा.सुधाकर राठोड, गोपाल राठोड, संतोष जाधव, प्रा.अनिल चव्हाण, अनिल राठोड आदिंची उपस्थिती होती. पुढे बोलतांना चव्हाण म्हणाले की, बंजारा बोली जीवंत ठेवणे , बोलीला भाषेचा दर्जा मिळावा, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न किताब देण्यात यावा, यासाठी व समाजाच्या विविध समस्या शासन दरबारी पोहोचविणे व समाजातील साहित्य प्रेमींना समाजाचा इतिहास मांडण्याची संधी या साहित्य परिषदेच्या माध्यमातुन उपलब्ध होणार असुन या साहित्य परिषदेस समाजाचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यावेळी प्रा.मोहन चव्हाण, प्रा.डॉ.प्रकाश राठोड यांनी आपले विचार मांडले. संचालन प्रा.प्रकाश चव्हाण यांनी केले तर आभार प्रा.लक्ष्मण राठोड यांनी मानले.