चांद्रमौळी झोपडीत उमलेले ‘साहित्य कमळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:40+5:302021-02-05T09:26:40+5:30

वाशिम: पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ साहित्यिक नामदेव चंद्रभान कांबळे उपाख्य ना.चं. हे अतिशय गरीब कुटुंबातील असून, वडिलांच्या हालाखीच्या ...

'Sahitya Kamal' boiled in Chandramouli hut | चांद्रमौळी झोपडीत उमलेले ‘साहित्य कमळ’

चांद्रमौळी झोपडीत उमलेले ‘साहित्य कमळ’

वाशिम: पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ साहित्यिक नामदेव चंद्रभान कांबळे उपाख्य ना.चं. हे अतिशय गरीब कुटुंबातील असून, वडिलांच्या हालाखीच्या परिस्थितीत चांद्रमौळी झोपडीत राहून त्यांनी साहित्य क्षेत्रात लौकिक प्राप्त केला आहे.

नामदेव चंद्रभान कांबळे हे मालेगाव तालुक्यातील देशभरात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथील रहिवासी. त्यांचे पिता चंद्रभान कांबळे भूमीहीन आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत गरीब होते. पित्याच्या हलाखीच्या परिस्थितीत जगाचे भान ठेवून त्यांनी शिरपूर या खेडेगावातच त्यांचे बालपण गेले, त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षण घेतले. शिरपूर येथे उच्च शिक्षणाची सोय नसल्याने त्यांना शहरात शिक्षणासाठी जावे लागले. नागपूर येथे त्यांनी बीएस‌्सीची पदवी घेतली आणि एमबीबीएसला प्रवेश घेतला. एमबीबीएसमध्ये त्यांना प्रथम वर्षातच अपयश आले. त्यानंतर पुन्हा ते शिरपूर येथे परतले आणि चांद्रमौळी झोपडीतच राहून त्यांनी अजरामर अशा साहित्याच्या रचनेला सुरुवात केली. पुढे व्यवसाय, नोकरीसाठी त्यांनी शिरपूर गाव सोडले तरी चांद्रमोळी झोपडीतूच वाशिम जिल्ह्यातील अलौकिक असे ‘साहित्य कमळ’ उमलले, असे म्हणने वावगे ठरणार नाही. आता शिरपूर येथे त्यांचे घर नाही, अशी माहिती आहे.

===Photopath===

250121\25wsm_5_25012021_35.jpg

===Caption===

ना.चं. कांबळे यांची चांद्रमोळी झोपडी 

Web Title: 'Sahitya Kamal' boiled in Chandramouli hut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.