वाशिम बसस्थानकाची सुरक्षा वार्‍यावर

By Admin | Updated: September 12, 2014 23:14 IST2014-09-12T23:14:16+5:302014-09-12T23:14:16+5:30

लोकमत स्टिंग ऑपरेशन; नागरिकांच्या जिवित्वाशी खेळ: प्रशासनाचे साफ दुर्लक्ष.

Safety of Washim bus station | वाशिम बसस्थानकाची सुरक्षा वार्‍यावर

वाशिम बसस्थानकाची सुरक्षा वार्‍यावर

वाशिम: येथील जिल्ह्याचे मध्यवर्ती बसस्थानक आणि बस आगाराची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, प्रवाशासोबतच या ठिकाणी कार्यरत कर्मचार्‍यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव लोकमत स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आले आहे. बस स्थानक व बस आगारात सुरक्षा नियोजनाकडे कमालीचे दुर्लक्ष दिसुन आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागांर्गत येणार्‍या वाशिम बसस्थानकात ११९ वाहक, १३0 चालक आणि बस आगारातील कार्यशाळेत मॅकेनिक, क्लिनर, हेल्पर मिळून जवळपास ४0 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांसाठी दोन्ही ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव यावेळी दिसून आला. आगाराची मालमत्ता सुस् िथतीत रहावी याकरीता कोणत्याच उपाय योजना नसल्याने कोणतीही वस्तू चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच सुरक्षा नियमाअभावी कुठलाही अनुचित प्रकार होऊ शकतो.

** प्रवाशांचे स्वागत होते गटारातून

वाशिम बसस्थानकाच्या मुख्यद्वारासमोर पाण्याचे डबके साचल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

** स्वच्छतेच्या अभावामुळे प्रवाशांचे आरोग्यही धोक्यात

लोकमत टिमने केलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान बसस्थानक आवारात स्वच्छतेचा अभाव दिसून आला. विशेष म्हणजे प्रवाशांसाठी असलेले स्वच्छतागृहाची तर दुदर्शा आहेच त्यासोबत कर्मचार्‍यांसाठी असलेले स्वच्छतागृहाच्या परिसरदेखील कमालीचा अस्वच्छ आढळुन आला.

** आगार व्यवस्थापकाच्या कार्यालयाला तडे

आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयातील भिंतीला मोठी तडा गेली असून, या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्यशाळेतील कर्मचार्‍यांसह इतर विभागातील कर्मचार्‍यांसाठी बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांची दशाही अत्यंत वाईट असून, प्रसाधनगृहांच्या बाजुलाच झुडूपांचे साम्राज्य आहे.

** महिला वाहक कक्ष अपूर्णच

महिला वाहकांना मुक्कामी व आरामासाठी तयार करण्यात येत असलेल्या कक्षाचे बांधकाम अनेक वर्षांंपासून बांधकाम रखडलेले आहे. त्यामुळे अपुर्ण अवस्थेतील वाहतुक कक्षाचीसुद्धा पडझड झाली आहे.

** आगाराची मालमत्ता उघडयावर

 आगाराची मालमत्ता सुस्थितीत रहावी याकरीता कोणत्याच उपाय योजना नसल्याने कोणतीही वस्तू चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे. वाहकांच्या पेटया ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या रूमला दरवाजा तर नाहीच शिवाय भिंतीही पडलेल्या आहेत. सुरक्षितता काहीच दिसून येत नाही

**कार्यशाळेची दुरावस्था

कार्यशाळेत बस दुरुस्तीचे ठिकाण (रॅम्प) जीर्ण झाले आहे. गाडी उभी करण्याच्या ठिकाणचे काँक्रीट उखडले असून. त्या ठिकाणच्या सळय़ा उघड्या पडल्या आहेत. कार्यशाळेचे छत पूर्णपणे खिळखिळे झाले असून, पाऊस सुरू असताना कर्मचार्‍यांना पावसात भिजतच येथे काम करावे लागते. रॅम्पवर १४ ट्यूब लाईट्सची व्यवस्था असताना त्या ठिकाणी केवळ दोनच ट्यूब लाईट्स सुरू आहेत. लाईट्सच्या ताराही उघड्या असून येथे पाणीही नाही.

** आगारातून धावतात ५४ बसेस

वाशिम आगारात एकूण ५४ बसेस असून, यापैेकी दिवसाच्या वेळी जवळपास १८, तर रात्रीच्या वेळी २८ मिळून अंदाजे ४६ गाड्यांचा समावेश आहे. या कामासाठी एका महिला मॅकेनिकसह जवळपास ४0 मॅकेनिक या येथे काम पाहतात.

Web Title: Safety of Washim bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.