वाशिम बाजार समितीकडून कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST2021-04-26T04:37:27+5:302021-04-26T04:37:27+5:30
बाजार समितीचे मुख्य प्रशासक रेखा सुरेश मापारी व सचिव बबनराव इंगळे यांच्या पुढाकाराने बाजार समितीमधील सर्व कर्मचाऱ्यांचा २५ लाखांचा ...

वाशिम बाजार समितीकडून कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच
बाजार समितीचे मुख्य प्रशासक रेखा सुरेश मापारी व सचिव बबनराव इंगळे यांच्या पुढाकाराने बाजार समितीमधील सर्व कर्मचाऱ्यांचा २५ लाखांचा विमा काढण्यात आला आहे. या सुरक्षा कवचाचा बाजार समितीमधील २१ कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी-विक्री होते. संपूर्ण पश्चिम विदर्भात प्रसिद्ध असलेल्या वाशिम बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना विविध सुविधा दिल्या जात आहेत. कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत असतानासुद्धा विपरीत परिस्थितीत बाजार समितीमधील कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. अशा वेळी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची भविष्याची काळजी घेण्यासाठी बाजार समितीच्या मुख्य प्रशासक रेखा मापारी व सचिव बबन इंगळे यांनी पुढाकार घेत प्रत्येक कर्मचाऱ्यांचा २५ लाखांचा विमा काढला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.