भरधाव लक्झरीची ऑटोरिक्षाला धडक; चार जण जखमी
By Admin | Updated: May 6, 2015 00:20 IST2015-05-06T00:20:07+5:302015-05-06T00:20:07+5:30
वाशिम येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू

भरधाव लक्झरीची ऑटोरिक्षाला धडक; चार जण जखमी
वाशिम : मंगरूळपीरहून वाशिमकडे येत असलेल्या लक्झरी चालकाने एका ऑटोरिक्षाला जबरदस्त धडक दिली. या धडकेत चार प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असुन त्यांचेवर वाशिम येथील सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना ५ मे रोजी सकाळी ८:३0 वाजताचे सुमारास घडली. मंगरूळपीरहून वाशिमच्या दिशेने भरधाव वेगात येणार्या खासगी प्रवासी लक्झरी (एम.एच.३0 ए.ए. ५१७७) चालकाने वाशिमकडेच येणार्या ऑटोरिक्षाला (एम.एच.३७ जी ४१३६) धडक दिली. ऑटोरिक्षामधील चार प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. यामध्ये आसेगाव ता. मंगरूळपीर येथील अब्दुलखाँ अफजलखाँ (वय २६), फयजनखाँ रऊफखाँ (वय २0), मोहम्मदखाँ अलमखाँ (वय ३५), अब्दुल रहेमान अब्दुल अजीज (वय ५५) या चौघांचा समावेश आहे. या चारही जखमी प्रवाशांवर वाशिम येथील सामान्य रूग्णालयामध्ये उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आसेगाव पोलिसांनी लक्झरी चालक शेख मजीद शेख रज्जाक (रा. गायवळ ता. कारंजा) या ५0 वर्षीय इसमाला अटक करून त्याचेविरूध्द आसेगाव पोलिस स्टेशनमध्ये भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८, सहकलम १८४ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा तपास ठाणेदार सुनिल अंबुलकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक काशिराम वाणी करीत आहेत.