वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:37 IST2021-04-14T04:37:51+5:302021-04-14T04:37:51+5:30
गतवर्षापासून शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. निसर्गाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. १९ फेब्रुवारीच्या गारपीट वादळी पावसाने ...

वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांची धावपळ
गतवर्षापासून शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. निसर्गाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. १९ फेब्रुवारीच्या गारपीट वादळी पावसाने शिरपूर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्याचा मोबदला अजून तर हाती पडलाच नाही. पण त्यातून काही प्रमाणात वाचलेले हळद, बिजवाई कांदा हे पीक काढणी सुरू आहे. अशातच १३ एप्रिल गुढीपाडव्याचा अर्थातच मराठी वर्षाचा मुहूर्ताचा दिवस. कोरोना संसर्गजन्य आजाराने सर्व मानवी समाज त्रस्त असताना किमान निसर्ग तरी शेतकऱ्यांना साथ देईल असे शेतकऱ्यांना वाटत होते. गुढीपाडव्याची गुढी उभारून शेतकरी आपापल्या शेतात गेले. हळद काढणी, कांदा बिज काढणी सुरू असताना दुपारी २ वाजताच्या सुमारास आकाशात ढग जमा झाले. वादळी वारा सुटला आणि पावसाची भुरभुर सुरू झाली. यामुळे शेतकऱ्यांची त्रेधा उडाल्याचे चित्र शिरपूर परिसरात पाहायला मिळाले.