धावती ओमनी पेटली

By Admin | Updated: May 15, 2014 22:44 IST2014-05-15T22:38:32+5:302014-05-15T22:44:12+5:30

मालेगाव वाशिम रोडवर झोडगा फाट्याजवळ धावत्या ओमनी कारने पेट घेतल्याची घटना घडली.

Running ominic | धावती ओमनी पेटली

धावती ओमनी पेटली

मालेगाव : मालेगाव वाशिम रोडवर झोडगा फाट्याजवळ धावत्या ओमनी कारने पेट घेतल्याचीआज (दि.१५)रोजी सकाळी घटना घडली. चंद्रकांत मिठूलाल रांदड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जउळका येथील एम.एच. १९-१४१८ या ओमनी कारने मनिष गोपालदास तोष्णीवाल, जयश्री मनिष तोष्णीवाल, साक्षी सुनिल रांदड हे वाशिमकडे जात असताना झोडगा गावाजवळ कारने अचानक पेट घेतला. ही बाब चालक कुलदीप मारोती डाखोरे यांच्या लक्षात आली. तेव्हा त्या ताबडतोब सर्वजणांना गाडीच्या खाली उतरविले. त्यानंतर कारने अचानक मोठा भडका घेतला. सदर कार गॅसच्या किटची असल्याने पाहता पाहता आग वाढत गेली. आसपासच्या नागरिकांनी कारला विझविण्याचा प्रयत्न केला. वाशिम येथून अग्निशामक दल बोलावून कारला विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर घटना सकाळी ११ ते १२ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेत गाडीचे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले. पुढील तपास ठाणेदार आर.एस. तट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलवंत व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Web Title: Running ominic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.