भरधाव ट्रकने विद्यार्थिनीला चिरडले!

By Admin | Updated: March 24, 2016 02:45 IST2016-03-24T02:45:30+5:302016-03-24T02:45:30+5:30

कारंजाजवळील येथील नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील घटना.

Rowdy truck hit the student! | भरधाव ट्रकने विद्यार्थिनीला चिरडले!

भरधाव ट्रकने विद्यार्थिनीला चिरडले!

कारंजा लाड: भरधाव ट्रॅक्टरने मंगरुळपीर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात तिचा घटनास्थळी मृत्यू झाला. नंदिनी शंकर भगत (१८) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती मंगरूळपीर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्गात शिक्षण घेत होती.
मंगरूळपीर तालुक्यातील धोत्रा (बेलखेड) येथील रहिवासी नंदिनी भगत आणि तिचा मोठा भाऊ अक्षय शंकर भगत हे दोघे एमएच ३७- के- ४१९२ क्रमांकाच्या दुचाकीने धोत्रा ते कारंजा मार्गे देवदर्शनासाठी रामगाव जनुना, ता. दारव्हा येथे जात होते. कारंजानजीक विरुद्ध दिशेने येणार्‍या क्र. एमएच २७ बीबी- 0२९१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात ट्रॅक्टरचे मागचे चाक नंदिनीच्या डोक्यावरून गेल्याने तिच्या डोक्याचा अक्षरश: चेदामेंदा झाला. त्यानंतर ट्रॅक्टर चालक काही अंतरावर ट्रॅक्टर उभा करून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच मृतक नंदिनीच्या कुटुंबातील सदस्य व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Rowdy truck hit the student!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.