वाहन अडवून ३५ हजार रुपये लुटले !
By Admin | Updated: July 13, 2017 20:02 IST2017-07-13T20:02:19+5:302017-07-13T20:02:19+5:30
मंगरूळपीर : कंझरा फाट्याजवळ दोन दुचाकी वाहनावर आलेल्या चार अज्ञात इसमांनी चारचाकी वाहन अडवून, त्यामधील ३५ हजार रुपये लुटल्याची घटना १२ जुलैचे रात्री ८.३० वाजतादरम्यान घडली.

वाहन अडवून ३५ हजार रुपये लुटले !
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : तालुक्यातील कंझरा फाट्याजवळ दोन दुचाकी वाहनावर आलेल्या चार अज्ञात इसमांनी चारचाकी वाहन अडवून, त्यामधील ३५ हजार रुपये लुटल्याची घटना १२ जुलैचे रात्री ८.३० वाजतादरम्यान घडली. गणेश परंडे रा. पिंपळखुटा संगम ता. मंगरूळपीर यांच्या फिर्यादीवरून मंगरूळपीर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंवी कलम ३९२, ३४ भादंवी अन्वये १३ जुलै रोजी गुन्हा दाखल केला.
गणेश जगदेवराव परंडे यांच्या फिर्यादीनुसार, ते व त्यांचा भाऊ चारचाकी वाहनाने महान येथून गोळ्या बिस्किटाचे दुकान बंद करुन पिंपळखुटा येथील घरी येत होते. दरम्यान, कंझरा फाटाजवळ ५७५७ क्रमांकाची एक पल्सर व दुसरी विना क्रमांकाची पल्सर अशा दोन मोटारसायकलवर एकूण चार अज्ञात चोरट्यांनी परंडे यांचे चारचाकी वाहन संगणमताने थांबविले. यावेळी धमकी देत वाहनातील चालकाच्या सीटवरील ३५ हजार रुपये काढून घेतले तसेच आरडाओरड केल्याचे मारण्याची धमकी दिली. अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रुपये घेऊन पोबारा केला. या तक्रारीहून मंगरूळपीर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला.