तोतया पोलिसाने १५ हजाराने लुटले

By Admin | Updated: July 3, 2014 02:01 IST2014-07-03T01:55:39+5:302014-07-03T02:01:38+5:30

वाशिम येथे पोलिस असल्याची बतावणी करून ४५ वर्षीय इसमास १५ हजाराने लुबाडले.

The robbed police robbed 15,000 | तोतया पोलिसाने १५ हजाराने लुटले

तोतया पोलिसाने १५ हजाराने लुटले

वाशिम : ह्यमी पोलिस अधिकारी आहे. तुमची झडती घ्यावयाची आहे ह्णअशी बतावणी करून एका अज्ञात इसमाने ४५ वर्षीय इसमास १५ हजाराने लुबाडले. ही घटना अकोला नाका येथे १ जुलै रोजी रात्री १0:३0 वाजताचे सुमारास घडली. गेल्या १५ दिवसामधील ही अशा प्रकारची तिसरी घटना आहे, हे उल्लेखनीय.
प्राप्त माहितीनुसार मसला पेन ता. मालेगाव येथील नंदू सुदामन तहकिक हे वैयक्तिक कामानिमित्त वाशिम येथे आले होते.
वाशिम येथील अकोला नाका परिसरात त्यांच्याजवळ एक अज्ञात इसम आला.त्या इसमाने आपण पोलिस असल्याचे सांगून तहकिक यांची झडती घेतली. झडती घेत असताना हातचलाखी करून खिशामधील १५ हजार रूपये घेऊन अज्ञात भामटा पसार झाला. या घटनेची तहकिक यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द भादंविचे कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: The robbed police robbed 15,000