दगडफेकीत प्रवासी गंभीर
By Admin | Updated: November 18, 2016 02:24 IST2016-11-18T02:24:28+5:302016-11-18T02:24:28+5:30
वाशिमहून वसमतकडे जाणा-या रेल्वेवर गुराख्याने भिरकावला दगड.

दगडफेकीत प्रवासी गंभीर
वाशिम, दि. १७- वाशिमहून वसमतकडे जाणार्या पॅसेंजर रेल्वेच्या दिशेने एका अज्ञात गुराख्याने दगड भिरकावल्याने संतोष तळणकर नावाच्या प्रवाशाचा पाय फ्रॅर झाल्याची घटना १६ नोव्हेंबरला घडली असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिवाळी संपल्यानंतर आपल्या पत्नीला माहेरहून घेऊन येण्यासाठी संतोष रंगनाथ तळणकर (रा. देवपेठ, वाशिम) वसमतला पॅसेंजर रेल्वेने जात होते. रेल्वेमध्ये गर्दी असल्यामुळे संतोष तळणकर दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करीत होते. केकतउमरा रेल्वे स्टेशनच्या अलीकडे एका गुराख्याने रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावला. या दगडाचा संतोष तळणकर यांच्या पायावर गंभीर स्वरूपात मार लागला. यामध्ये संतोष यांचा डावा पाय फ्रॅर झाला. संतोष यांच्यावर वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची रेल्वे पोलिसांनी थातूरमातूर चौकशी करून प्रकरण थंड बस्त्यात ठेवल्यामुळे तळणकर यांच्या कुटुंबीयांनी असमाधान व्यक्त केले. रेल्वे प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली.