शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा नदीवर रास्तारोको, लोणीत मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 15:40 IST

सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजीत बंदला संग्रामपुर तालुक्यात बंदला सर्वधर्मीय पाठिंबा मिळाला. तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. खिरोडा येथील पूर्णा नदीवर रास्तारोको करण्यात आला.

संग्रामपूर(वाशिम) : सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजीत बंदला संग्रामपुर तालुक्यात बंदला सर्वधर्मीय पाठिंबा मिळाला. तालुक्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. खिरोडा येथील पूर्णा नदीवर रास्तारोको करण्यात आला. यावेळी काही युवकांनी टायर जाळून सरकारचा निषेध नोंदवला. तर आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. लोणी येथे आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली होती.

संग्रामपुर तालुक्यातील चांगेफळ निवाणा, संग्रामपुर, वरवट बकाल, पातुडार, मनार्डी, खिरोडा फाटा, एकलारा, बावनबिर, टुनकी, सोनाळा सह संपूर्ण तालुक्यात दुकाने ठेवण्यात आली होती. सकल मराठा समाजासह तालुक्यातील सर्वधर्मीय नेत्यांनी मोठ्यासंख्येने सहभाग दर्शवित बंद पाळण्याचे आवाहन केले. 

लोणी :मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुख्य मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी बंद पुकारण्यात आला. या बंददरम्यान रिसोड तालुक्यातील लोणी बु. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक पे्रतयात्रा काढून दहनविधीही करण्यात आला. या अभिनव आंदोलनात सर्वधर्मियांनी सहभाग नोंदविला होता

पूर्णा नदीवर रास्तारोको :वरवट बकाल संग्रामपुर रस्त्यावर व खिरोडा पुर्णा नदीच्या पुलावर टायर जाळून शासनाचा निषेध करण्यात आला. बंद दरम्यान सर्व बाजारपेठा, प्रतिष्ठाने कडकडीत बंद होत्या. सकल मराठा समाज आज रस्त्यावर दिसुन आला. समाजातर्फे काळयाफिती लावून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. तालुक्यात सर्वत्र रस्ता रोको करण्यात आल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. शाळा महाविद्यालयेही बंद होती. 

प्रत्येक बसथांब्यावर पोलीस तैनात :या बंददरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कोलमडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. एसटीची प्रवासी वाहतूक बंद राहिली तरी, खासगी वाहतूक सुरळीत राहावी म्हणून जिल्ह्यातील सर्वच मुख्य मार्गावरील प्रत्येक थांब्यावर पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने गुरुवारी राज्यात पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळला. संपूर्ण जिल्ह्यात सकाळपासूनच बंदचे वातावरण तयार झाले होते. नागरिकांनी स्वेच्छेनेच आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवली. शाळा महाविद्यालयांना संस्थाचालकांनी सुरक्षिततेची बाब लक्षात घेत, सुटी दिली. दरम्यान, दुपारपर्यंत रस्त्यांवर कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा