रस्ता चिखलमय; शेतात जावे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:44 IST2021-08-22T04:44:10+5:302021-08-22T04:44:10+5:30
वाशिम : गत तीन, चार दिवसांत कमी-अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पाणंदरस्ते चिखलमय झाल्याने शेतात जावे कसे? असा संतप्त सवाल ...

रस्ता चिखलमय; शेतात जावे कसे?
वाशिम : गत तीन, चार दिवसांत कमी-अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पाणंदरस्ते चिखलमय झाल्याने शेतात जावे कसे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे, आदींसाठी शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, दीर्ष कालावधीनंतरही पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने चिखलमय रस्त्यावरून शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाले. गोवर्धन, डही, कवठा, चिखली, आदी परिसरांतील शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतात जावे लागत आहे. गोवर्धन येथे तर चिखलात ट्रॅक्टर फसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली. पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण व खडीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
०००००००००००००
शासनाकडून निधी मिळावा !
पाणंद रस्ते चिखलमय होत असल्याने शेतकऱ्यांना चिखलातून शेतात जाण्याची वेळ आली आहे. पाणंद रस्ते चिखलमुक्त करण्यासाठी शासनाने पुरेशा प्रमाणात निधी पुरवावा, अशी मागणी डही येथील शेतकरी उमेश अवचार यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.