मंगरुळपीरमधील नदी-नाले कोरडे; भाविकांसमोर विसर्जनाची चिंता

By Admin | Updated: September 28, 2015 02:17 IST2015-09-28T02:17:09+5:302015-09-28T02:17:09+5:30

अपु-या पावसाळ्यामुळे नदी-नाले कोरडी पडलीत.

Rivers and rivers in Mangaralpur dry up; Concerns of immersion before the devotees | मंगरुळपीरमधील नदी-नाले कोरडे; भाविकांसमोर विसर्जनाची चिंता

मंगरुळपीरमधील नदी-नाले कोरडे; भाविकांसमोर विसर्जनाची चिंता

मंगरुळपीर (जि. वाशिम) : यंदाच्या अपुर्‍या पावसाळ्यामुळे नदी-नाले कोरडी पडल्याने गणेश विसर्जन कोठे करावे, असा प्रश्न तालुक्यात बहुतांश गावातील गणेशभक्तांना पडला आहे. यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून गणेश मंडळांनी वर्गणीच्या पैशाची उधळपट्टी न करता अतिशय कमी खर्चात श्रीगणेशाची स्थापना केली होती. मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये ५४, तर आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये १७ गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली. तालुक्यात एकूण ७१ गणेश मंडळांनी स्थापना केली होती. आता गणरायाला निरोप देण्यास सुरूवात झाली असून, २८ व २९ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक निघणार आहेत.

Web Title: Rivers and rivers in Mangaralpur dry up; Concerns of immersion before the devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.