नदी, नाले तुडुंब : दमदार पावसाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST2021-08-01T04:37:41+5:302021-08-01T04:37:41+5:30

रस्त्यावर साचले गटार वाशिम : येथील उड्डाणपुलाचे काम सुरू असून, या पुलाच्या बाजूला वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले ...

River, Nala Tudumb: Benefit of heavy rains | नदी, नाले तुडुंब : दमदार पावसाचा लाभ

नदी, नाले तुडुंब : दमदार पावसाचा लाभ

रस्त्यावर साचले गटार

वाशिम : येथील उड्डाणपुलाचे काम सुरू असून, या पुलाच्या बाजूला वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आता पावसाचे पाणी या खड्ड्यांत साचत असल्याने येथे गटार साचत असून, चालकांना मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

पोलिसांकडून वाहनांची तपासणी

वाशिम : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. या अंतर्गत शुक्रवारी वाशिम-मंगरुळपीर मार्गावर अनेक वाहनांची तपासणी करण्यात आली.

रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे लक्ष द्यावे!

वाशिम : शहरांमधील सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, व्यापारी संकुले व सर्व खासगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करून ती कार्यरत राहील, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु अद्याप अनेक ठिकाणी रेन वाॅटर हार्वेस्टिंग दिसून येत नाही.

Web Title: River, Nala Tudumb: Benefit of heavy rains