रिसोडला सामुहिक विवाह सोहळा
By Admin | Updated: January 28, 2016 23:06 IST2016-01-28T23:06:41+5:302016-01-28T23:06:41+5:30
सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन.

रिसोडला सामुहिक विवाह सोहळा
रिसोड (जि. वाशिम) : गत महिन्यात ६१ सर्वधर्मीय सामुहिक विवाहाचे यशस्वी आयोजनानंतर समता फाउंडेशन शाखा रिसोडतर्फे १३ फेब्रुवारी २0१६ ला परत सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन केले आहे. वाशिम जिल्हा व लगतचा परिसर दुष्काळाने होरपळत असून गेल्या तीन वर्षापासून दुष्काळ, नापिकी, गारपीट, अवकाळी पाउस, अस्मानी व सुलतानी संकटांच्या मालिकेने शेतकरी हवालदील झाला. आपल्या पाल्याचे विवाह कसे करावे या प्रश्नाने शेतकरी व शेतमजुरांची झोप उडाली. शेतकर्यांना दिलासा म्हणून गत महिन्यात २0 डिसेंबर रोजी समता मेमोरियल फाउंडेशनने ६१ सर्वधर्मीय जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा यशस्वी केला. या सोहळय़ाला मिळालेल्या प्रतिसादाने प्रेरित होवून पुन्हा १३ फेब्रुवारी २0१६ रोजी हिंगोली रोड येथे विवाह सोहळय़ाचे आयोजन केले आहे. ३ फेब्रुवारी २0१६ पर्यंत उपवधू-वर यांच्या विवाह नोंदणीची अंतिम तारीख असून उपवधु-वरांनी आवश्यक कागदपत्र देवून नोंदणी करणे आवश्यक आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय समता फाउंडेशन या विवाह सोहळय़ाचे आयोजन करीत आहे. परंतु शासनाच्या शुभमंगल योजनेअंतर्गत वधु पित्याने शासनाच्या सर्व अटींची पूर्तता केल्यास अशा जोडप्यांना सरकारी अनुदान उपलब्ध असल्यास ही संस्था अनुदान मिळवून देण्यात पुढाकार घेण्यात आहे.