रिसोड पं.स. सभापतीचा प्रभार सोपविला कृषी सभापतींकडे !
By Admin | Updated: April 22, 2017 00:08 IST2017-04-22T00:08:27+5:302017-04-22T00:08:27+5:30
सभापती पदाचा प्रभार जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

रिसोड पं.स. सभापतीचा प्रभार सोपविला कृषी सभापतींकडे !
वाशिम: अविश्वास ठराव पारित झाल्याने रिसोड पंचायत समितीचे सभापती व उपसभापतींना पायउतार व्हावे लागले. दरम्यान, नवीन सभापती-उपसभापतींची निवड होईपर्यंत सभापती पदाचा प्रभार जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
विविध कारणांमुळे भाजपासह शिवसेनेच्या सदस्यांनी रिसोड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीविरूद्ध १२ एप्रिल रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठरावासंदर्भात १८ एप्रिल रोजी विशेष सभा घेण्यात आली होती. यावेळी शून्य विरूद्ध १२ मताने अविश्वास ठराव पारित झाल्याने सभापती प्रशांत खराटे व उपसभापती नरवाडे यांना पायउतार व्हावे लागले. सध्या दोन्ही पदे रिक्त असल्याने आणि कामकाजात व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ७५ (१) नुसार कार्यवाही करून पंचायत समिती सभापती पदाची निवड होईपर्यंत, कृषी सभापती विश्वनाथ सानप यांच्याकडे रिसोड पंचायत समिती सभापती पदाचा प्रभार २१ एप्रिल रोजी सोपविला आहे.