रिसोड नगरपरिषदेला रिक्त पदांचे ग्रहण
By Admin | Updated: June 26, 2014 02:25 IST2014-06-26T02:19:36+5:302014-06-26T02:25:16+5:30
३४ हजार नागरिकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेला रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे.

रिसोड नगरपरिषदेला रिक्त पदांचे ग्रहण
रिसोड : शहरातील ३४ हजार १३0 नागरिकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या येथील नगर परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे.
शहरामध्ये न.प.क्षेत्र पाच प्रभागामध्ये विखुरलेले असून, नगर परिषदेत रिक्त पदाचा खेळ कित्येक दिवसापासून सुरु आहे. नगर परिषदेत रिक्त असलेल्या पदामध्ये स्वच्छता निरीक्षक गाडीचालक, उद्यान पर्यवेक्षक, फीटर ,कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक श्रेणी क, वायरमन, अग्निशामक चालक व कर्मचारी यांचा समावेश आहे. नगर परिषदेमध्ये सध्याच्या परिस्थितीत वर्ग क्रमाक ३ चे २५ पदे , वर्ग ४ ची ८१ पदे कार्यरत आहे. नगर परिषदमधील महत्त्वपूर्ण पद रिक्त आहे. आकृतीबंधानुसार नगर परिषदेमध्ये तब्बल १0 कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे संबंधित विभागांच्या विभागाच्या कामकाजावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. शहराच्या विकासासाठी ही महत्त्वपूर्ण पदे भरलेली असणे आवश्यक आहे. स्वच्छता निरीक्षकाचे पद रिक्त असल्यामुळे शहरातील स्वच्छतेकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले जात नाही.याचप्रमाणे रिक्त पदांमुळे शहराचे सौंदर्यीकरण, पाणीपुरवठा योजनांच्या कामात अडचणी येत आहेत. ही रिक्त पदे भरणे आवश्यक झाले आहे.