शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

रिसोड नगर परिषद निवडणूक; उपाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 3:06 PM

रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या पदाधिकारी, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपुष्टात येणार असल्याने २४ जानेवारीला उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या पदाधिकारी, सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपुष्टात येणार असल्याने २४ जानेवारीला उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक होत आहे. उपाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरू असून, विजयी कोण होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.१० डिसेंबर २०१८ रोजी रिसोड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहिर झाला होता. अटितटीच्या झालेल्या या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या ९ पदांवर विजय मिळविला होता तर काँग्रेस तीन, शिवसेना तीन, भारिप-बमसं दोन आणि अपक्ष तीन असे पक्षीय बलाबल आहे. कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने उपाध्यक्ष व विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जनविकास आघाडीला केवळ दोन सदस्यांची गरज असून, त्या दृष्टिने जुळवाजूळव सुरू झाल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. देश व राज्य पातळीवरील राजकारण आणि समविचारी पक्षांची महाआघाडी बघता रिसोड नगर परिषदेत काँग्रेस, शिवसेना व भारिप-बमसं यांची युती होते की जनविकास आघाडी आणि काँग्रेस मिळून नगर परिषदेची सत्ता बनते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर रिसोड नगर परिषदेत समविचारी पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली गतिमान झाल्याचे दिसून येते. तीन अपक्ष नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. २४ जानेवारीला उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक असल्याने बहुमताचा जादुई आकडा जूळविण्यासाठी जनविकास आघाडी तसेच काँग्रेस, शिवसेना, भारिप-बमसंतर्फे व्यूहरचना आखली जात असल्याने राजकीय वातावरण तापत आहे.

 उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेसची शिवसेना किंवा अन्य कुठल्याही पक्षासोबत अद्याप युतीसंदर्भात चर्चा झालेली नाही. अमित झनक, आमदार उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसंदर्भात सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन पुढील चर्चा केली जाणार आहे.डॉ. चंद्रशेखर देशमुख, उपजिल्हा प्रमुख शिवसेना पक्षाचे नगरसेवक तसेच वरिष्ठांच्या सुचनेनुसार पुढील रणनिती ठरविली जाईल. अद्याप युती, आघाडीसंदर्भात कुणाशी बोलणी झालेली नाही.डॉ. नरेशकुमार इंगळे, पक्षनिरीक्षक, भारिप-बमसं युती, आघाडीसंदर्भात कुणाशी चर्चा झाली नाही. समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न राहिल.- अ‍ॅड. नकुल देशमुख,  प्रमुख जनविकास आघाडी

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडElectionनिवडणूक