रिसोडमध्ये सायकलस्वारांनी केला पर्यावरणाचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:36 IST2021-01-21T04:36:37+5:302021-01-21T04:36:37+5:30
येथील हिंगोली मार्गावरील क्रीडासंकुल येथून हिरवी झेंडी दाखवून सायकल स्पर्धेस प्रारंभ झाला. यावेळी नगराध्यक्ष विजयमाला आसनकर, तहसीलदार अजित शेलार, ...

रिसोडमध्ये सायकलस्वारांनी केला पर्यावरणाचा जागर
येथील हिंगोली मार्गावरील क्रीडासंकुल येथून हिरवी झेंडी दाखवून सायकल स्पर्धेस प्रारंभ झाला. यावेळी नगराध्यक्ष विजयमाला आसनकर, तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी गणेश पांडे, ठाणेदार एस.एम. जाधव, आरोग्य सभापती कपिल कदम, पाणीपुरवठा सभापती जैनुद्दीन काजी, संतोष चराटे, अब्दुल तस्लीम, कृष्णा महाराज आसनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. १० किलोमीटर अंतराच्या या स्पर्धेत पहिल्या तीन विजेत्यांमध्ये वाशिमच्या दोन स्पर्धकांचा समावेश आहे. स्पर्धा संपल्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते राजेश जाधव यांना प्रथम पारितोषिक म्हणून तीन हजार रुपये रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. मिथुन जाधव यांना द्वितीय दोन हजार रुपये, रोख मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले; तर तृतीय क्रमांक रिसोड येथील मयूर पत्रे यांनी मिळविला. त्यांना एक हजार रुपये रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले. स्पर्धा आयोजनासाठी प्रतापराव देशमुख, मुजम्मील मनियार, रोहित मुंदडा यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन संदीप देशमुख यांनी केले.