बियाणे संक्रमणाचा धोका; रोगांचा प्रादुर्भाव

By Admin | Updated: September 27, 2014 00:00 IST2014-09-26T23:50:32+5:302014-09-27T00:00:33+5:30

वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव.

The risk of seed transplantation; Influence of diseases | बियाणे संक्रमणाचा धोका; रोगांचा प्रादुर्भाव

बियाणे संक्रमणाचा धोका; रोगांचा प्रादुर्भाव

संतोष मुंढे / वाशिम
जिल्हय़ात पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणात विशिष्ट सोयाबीन वाणाच्या पिकांवर आलेल्या पिवळ्य़ा मोझ्ॉकच्या आक्रमणाने भविष्यात बियाण्यांमध्ये त्या विशिष्ट सोयाबीनच्या संक्रमणाचा धोका वाढला आहे. सोबतच यावेळी या धोक्याचे परिणाम काही ठिकाणीच जाणवला असला तरी विशिष्ट वाणावरच झालेले यावेळचे पिवळ्य़ा मोझ्ॉकचे आक्रमण भविष्यात मोठय़ा प्रमाणात पेरल्या जाणार्‍या पिकावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी २ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. दूबार, तिबार पेरणीने आधीच मेताकूटीस आलेल्या शेतकर्‍यांनी उशिरा का होईना कशीबशी आलेल्या पावसाच्या भरवश्यावर सोयाबीनची पेरणी केली. पेरणी केलेल्या सोयाबीनचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकर्‍यांनी जमेल त्या पध्दतीने संगोपनही केले. परंतू सप्टेंबरच्या दूसर्‍या आठवड्यात खोडकिड, खोडसड, मुळसड यासह विशिष्ट वाणाच्या सोयाबीनवर आलेल्या मोठय़ा प्रमाणातील पिवळ्य़ा मोझ्ॉकने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळविले. अनेक शेतकर्‍यांनी मोठय़ा उत्पादनाच्या आशेने पेरलेले त्या विशिष्ट जातीच्या सोयाबीनचे पिक उपटून फेकण्याची पाळी शेतकर्‍यांवर आली.
जिल्ह्यातील किमान चार ते पाच टक्के शेतकर्‍यांनी जवळपास १0 ते १५ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्यादा उत्पादनाच्या आशेने , लखपती, करोडपती, श्रीमंती आदी नावाने ओळखल्या जाणार्‍या या विशिष्ट सोयाबीन वानाची कृषी विभागाने शिफारस केली नसतांनाही पेरणी केली. त्यामधील पाच ते सात हजार हेक्टरवरील सोयाबीन उपटून फेकण्याची पाळी आल्याचे मानले तरी ज्या क्षेत्रावरील लखपती, करोडपती, श्रीमंती नावाच्या सोयाबीनचे ते पिक कायम राहिले असेल, त्या पिकापासून उत्पादीत सोयाबीन संबंधीत शेतकरी बाजारात इतर सोयाबीनसोबत विक्री करण्याची शक्यता आहे. अर्थात तसे झाल्यास पिवळा मोझ्ॉकचा कायम धोका असणार्‍या संबंधित लखपती, करोडपती, श्रीमंती वानापासून उत्पादीत सोयाबीन मोठय़ा प्रमाणात पेरल्या जाणार्‍या व कृषी विभाग शेतकर्‍यांना पेरण्याची शिफारस करणार्‍या सोयाबीनमध्ये मिसळल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: The risk of seed transplantation; Influence of diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.