शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Right To Education : मोफत प्रवेशासाठी चवथ्यांदा मुदतवाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 16:46 IST

Right To Education News २३ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याला मुदतवाढ देण्यात आली.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरटीई (राईट टू एज्युकेशन) अंतर्गत मोफत प्रवेश घेण्यासाठी चवथ्यांदा मुदतवाढ मिळाली असून, आता २३ नोव्हेंबरपर्यंत मोफत प्रवेश घ्यावे लागणार आहेत. आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिल्या वर्गात एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के मोफत प्रवेश दिले जातात. यावर्षी मार्च महिन्यात पुणे येथे पहिली लॉटरी काढण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील ९७६ बालकांची निवड झाली. आरटीई अंतर्गत जिल्ह्यात १०१ शाळांची नोंदणी झाली असून, १०११ जागा या मोफत प्रवेशासाठी राखीव आहेत. पहिल्या लॉटरी पद्धतीतून निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर ३० सप्टेंबरपासून प्रतीक्षा यादीतील बालकांना २३ आॅक्टोबरपर्यंत मोफत प्रवेशाची संधी दिली होती. या अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील ९७६ पैकी ६०६ बालकांनी प्रवेश घेतले. उर्वरीत ३७० बालकांचे प्रवेश झाले नसल्याने त्यांना मोफत प्रवेशापासून वंचित राहावे लागले. प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे किंवा बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल तर त्यांना शाळेशी संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शाळेच्या व्हॉटस् अ‍ॅप क्रमांकावर किंवा ई-मेल, अन्य सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे आवश्यक कागदपत्रे सादर करून तात्पुरता प्रवेश निश्चित करता येणार आहे. वारंवार मुदतवाढ मिळूनही ३७० बालकांच्या पालकांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत. या बालकांना मोफत प्रवेशाची आणखी एक संधी म्हणून २३ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याला मुदतवाढ देण्यात आली.

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा