रिधोरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक रुजू
By Admin | Updated: July 25, 2015 01:39 IST2015-07-25T01:39:22+5:302015-07-25T01:39:22+5:30
सात वर्गासाठी केवळ दोन शिक्षक या लोकमत वृत्ताची गटशिक्षणाधिका-यांनी घेतली दखल.

रिधोरा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक रुजू
रिधोरा (जि. वाशिम ) : येथील जि.प. शाळेमध्ये एकूण सात वर्ग असून, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तीनच वर्गखोल्या आहेत. सात वर्गांना शिकविण्यासाठी दोनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णच्या २४ जुलैच्या अंकात प्रकाशित केल्याबरोबर शिक्षण विभागाने दखल घेत तेथे एका शिक्षकाची नियुक्ती केली.
रिधोरा येथील जि.प.शाळेमध्ये एकूण तीन शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे. त्यापैकी एक शिक्षीका कांबे या एक महिन्याच्या रजेवर गेलेल्या आहेत. २३ जुलै रोजी शिक्षण विभागाची वाशिम येथे बैठक असल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका तायडे यांनी वाशिम येथे जावे लागले होते. परिणामी शाळेवर शिक्षक एक व वर्ग सात अशी विचित्र परिस्थीती निर्माण झाली होती परिणामी शिक्षक ज्या वर्गावर होते शिकवित होते तो वर्ग सोडून दुसर्या वर्गातील विद्यार्थी बाहेर खेळताना, घरी जाताना दिसून आले. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या संदर्भात सविस्तर वृत्त लोकमतने प्रकाशित करुन शाळेची परिस्थिती व विद्यार्थ्यांचे होत असलेले नुकसानाबाबत वृत्त प्रकाशित करताच गटशिक्षणाधिकारी रंगलाल राठोड यांनी रिधोरा जिल्हा परिषद शाळेवर एस.पी. घुगे नामक शिक्षकाची नियुक्ती केली. शाळेवर शिक्षकाची नियुक्ती झाल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान काही प्रमाणात टळले असून येथे विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक देण्याची मागणी पालक वर्गातून केल्या जात आहे. रिधोरा जिल्हा परिषद शाळेला एक शिक्षक मिळालयने पालकांत आनंद दिसून येत आहे.तसेच वरिष्ठांनी या प्रकरणाकडे लक्ष घालुन आणखी दोन शिक्षक मिळवुन द्यावेत तसेच आनखी तीन वर्ग खोल्या मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.