रिसोडमध्ये चार लाखांचा गुटखा जप्त

By Admin | Updated: July 18, 2014 01:02 IST2014-07-18T00:59:37+5:302014-07-18T01:02:39+5:30

पोलिसांची कारवाई : एक आरोपी ताब्यात

Ricoh seized gutkha of four lakh | रिसोडमध्ये चार लाखांचा गुटखा जप्त

रिसोडमध्ये चार लाखांचा गुटखा जप्त

रिसोड : स्थानिक लोणी फाटा व माळीपुरा परिसरातील गुटख्याच्या गोदामावर पोलिसांनी १७ जुलैला सकाळी १0 वाजताच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात तब्बल चार लाख रूपयांचा गुटखा जप्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार १७ जुलैला सकाळी आठ ते दहा वाजताच्या दरम्यान शहरात एका मारुती व्हॅनमध्ये गुटखा येणार असल्याची विश्‍वसनीय माहिती खबर्‍या मार्फत ठाणेदार सुरेशकुमार राऊत यांना मिळाली होती. प्राप्त माहितीची दखल घेत ठाणेदार राऊत यांनी शहरात एंट्री होण्याच्या प्रमुख मार्गावर साध्या पोषाखात पोलिस तैनात केले. सकाळपासूनच शहरात येणार्‍या प्रत्येक वाहनावर या पोलिसांची करडी नजर होती. दरम्यान, याचवेळी गुटखा तस्करी करणारी मारुती व्हॅन शहरात प्रवेश करताच ठाणेदार राऊत यांनी आपल्या ताफ्यासह मोठय़ा शिताफिने सदर व्हॅनला ताब्यात घेतले. त्यानंतर या गुटख्याच्या काळाबाजाराचे नेमके कनेक्शन कुठे आहे, याचा शोध घेऊन माळीपुर्‍यातील एका गोदामावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी चार लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. संबंधित विक्रेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग अकोला यांना तत्काळ माहिती देवून बोलावून घेतल्या गेले. त्यानंतर सदर विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अन्न सुरक्षा व मानके कायदा २00६ कलम ५९ अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिस स्टेशनला सुरु होती.
गुटखा जप्तीच्या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण पाच लाख ७१ हजार रुपयांची जप्ती दाखविली आहे. यामध्ये मारुती कंपनीची एक व्हॅन, मोटर सायकल, सितार, विमल , नजर, र्जदा आदी प्रकारच्या गुटखा जप्तीमध्ये दाखविण्यात आला आहे.
गुटखा विक्रेते शेख इमरान शेख शमशूर, बबन घोटे, राकेश चौधरी, रवींद्र सोनकाटे, यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ठाणेदार सुरेशकुमार राऊत, सहायक पो.उप.निरीक्षक संजय गवई, पो.उप.नि.कांबळे, नरोटे, पो.कॉ. राम गायकवाड, ज्ञानेश्‍वर उगले, तान्हाजी ढेंगळे, सुनील गोतरकर, सुधीर सोळंके, विनोद धनवर, शांताराम राठोड, वानखेडे, निवाणे, राम चवरे, आदी पोलिस कर्मचारी सहभागी होते. दरम्यान, आजच्या पोलिस छापा सत्राने गुटखा विक्रेत्यांच्या विश्‍वात एकच खळबळ उडाली आहे. शहरात दिवसभर याविषयी चर्चा सुरु होती. या कारवाईवरून रिसोडमध्येच नव्हे तर जिल्ह्यात गुटख्याचा काळाबाजार सुरू असल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Web Title: Ricoh seized gutkha of four lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.