शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वाशीम जिल्ह्यातील बॅरेजेसमध्ये मुबलक जलसाठा; पण पाणी केले आरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 09:24 IST

जिल्ह्यातील बॅरेजेसमध्ये मुबलक लसाठा आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असल्याने संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. परिणामी, सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.

ठळक मुद्देसिंचनाचा प्रश्न ऐरणीवर: शेतकरी हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून जिल्हयातील पैनगंगा नदीवर जलसंपदा विभागाने ११ ठिकाणी बॅरेजेस उभे केले. त्यात यंदाच्या पावसाळ्यानंतर १०० टक्के पाणीसाठा झाला. आताही ५० टक्क्याच्या आसपास जलसाठा आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता असल्याने संपूर्ण पाणी पिण्याकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. परिणामी, सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाल्याने शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.पैनगंगा नदीवर वरुड, जुमडा, कोकलगांव, अडगांव, गणेशपूर, राजगांव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी प्रथम प्राधान्याने बॅरेजेसची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. इतर ठिकाणचे सिंचन प्रकल्प, गावतलावांची पाणीपातळी झपाट्याने खालावली असताना या बॅरेजेसमध्ये मात्र पुरेसा जलसाठा आहे. त्याचा वापर उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारण्याकरिता करण्याचे प्रशासनाने निश्चित केले असून बॅरेजेसमधून सिंचनासाठी थेंबभरही पाणी वापरू नये, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयाचे उल्लंघन करणाºयाविरूद्ध धडक कारवाई करण्याचा फतवाही प्रशासनाने जाहीर केला आहे. यामुळे सिंचन होण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंग पावले असून, रब्बी हंगाम संकटात सापडला आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी थोडेफार तरी पाणी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Damधरण