वाशिम तहसिलदारांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:42 IST2021-05-13T04:42:00+5:302021-05-13T04:42:00+5:30
००००० मोठेगाव येथे २० रुग्ण आढळले वाशिम : रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे आणखी १० जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ ...

वाशिम तहसिलदारांनी घेतला आढावा
०००००
मोठेगाव येथे २० रुग्ण आढळले
वाशिम : रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे आणखी १० जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ मे रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची माहिती संकलित केली जात असून, संदिग्ध रुग्णांचे स्वॅब घेतले जाणार आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
०००००
पाणीटंचाई निवारणार्थ विहिर अधिग्रहण
वाशिम : ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ विहिर अधिग्रहणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत जवळपास ३० विहिरींचे अधिग्रहण केले असून, आवश्यक तेथे विहिर अधिग्रहण करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने गटविकास अधिकाºयांना बुधवारी दिल्या.
०००००
शिरपूर येथे ७० जणांची तपासणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे आणखी सात जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे १२ मे रोजी निष्पन्न झाले. गत दोन दिवसात शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्राच्या पथकाने ७० जणांची तपासणी केली आहे.