प्रलंबित कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:09 IST2021-01-08T06:09:50+5:302021-01-08T06:09:50+5:30

००० क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवा ! रिसोड : तालुक्यातील गुणवंत खेळाडूला पुरस्कार मिळावा याकरिता सन २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हा ...

Review of pending works | प्रलंबित कामांचा आढावा

प्रलंबित कामांचा आढावा

०००

क्रीडा पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठवा !

रिसोड : तालुक्यातील गुणवंत खेळाडूला पुरस्कार मिळावा याकरिता सन २०२०-२१ या वर्षाकरिता जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी इच्छुक खेळाडूंनी १६ जानेवारीपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवावे, असे आवाहन क्रीडा विभागाने केले.

0000

वर्गखोली दुरुस्तीसाठी निधीची प्रतीक्षा

शिरपूर : परिसरात जिल्हा परिषद शाळेच्या आठ वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यासाठी निधीची मागणी नोंदविण्यात आली. अद्याप निधी मिळाला नाही. शासनाकडून निधी केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा कायम आहे.

०००००

पोषण आहार योजनेचा आढावा

वाशिम : अंगणवाडी केंद्रातील बालकांना घरपोच पोषण आहार पुरविण्यात येत आहे. या योजनेचा आढावा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी ५ जानेवारी रोजी घेतला.

Web Title: Review of pending works