समृद्ध गाव स्पर्धेच्या आढावा बैठकीत जलप्रेमी, जलदूतच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:46 PM2020-12-19T12:46:02+5:302020-12-19T12:48:36+5:30

या कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील एकमेव जलनायकासह जलदूत, जलमित्रांना देण्यातच आली नाही.

In the review meeting of Samriddh Gaon competition, there are no water lovers, no water ambassadors | समृद्ध गाव स्पर्धेच्या आढावा बैठकीत जलप्रेमी, जलदूतच नाहीत

समृद्ध गाव स्पर्धेच्या आढावा बैठकीत जलप्रेमी, जलदूतच नाहीत

googlenewsNext
ठळक मुद्दे वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवर यंदा समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १७ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पाणी फाउंडेशनकडून वॉटर कप स्पर्धेच्या धर्तीवर यंदा समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेतील कामांचा आढावा घेण्यासह प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन १७ डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर करण्यात आले. तथापि, यासाठी अत्यावश्यक असलेले आणि शासनाकडून नियुक्त जलनायक, जलप्रेमी आणि जलदूतांनाच या कार्यक्रमाची माहिती न देण्याचा अजब कारभार प्रशासनाने केल्याचे उघडकीस आले.
 जिल्ह्यातील ५३ गावांत समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेचा आढावा घेण्यासह संबंधित गावांतील सरपंच, गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात १८ डिसेंबर रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात स्पर्धेंतर्गत मग्रारोहयो गाव नियोजन आराखडा तयार करणे, फळबाग लागवडी व संधी, मत्स्यविकास योजनेतून उत्पादन वाढ, पशुसंवर्धन व कुरण विकास कार्यक्रमातून आर्थिक उन्नती, समृद्ध गाव स्पर्धेसाठी मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट दाखविण्यासह सादरीकरण करणे आदी कार्यक्रमांसह मृद व जलसंधारण विषयक कामांची एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाही घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी तहसीलस्तरावरून गावचे सरपंच, जलनायक, जलमित्र, जलदूतांना आमंत्रित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात या कार्यक्रमाची माहिती जिल्ह्यातील एकमेव जलनायकासह जलदूत, जलमित्रांना देण्यातच आली नाही.


अभ्यासकच नाहीत, तर मार्गदर्शन मिळणार कसे
राज्यशासनाने वाढत्या पाणीसमस्येवर नियंत्रणासाठी राज्यस्तर ते गावस्तरावर जलनायक, जलमित्र, जलदुतांची फ ळीच उभारली आहे. या मंडळीने बारीकसारीक निरीक्षणासह आवश्यक प्रशिक्षणही पूर्ण केले असून, मृद व जलसंधारणाबाबत त्यांच्या अभ्यासाचा आधार घेणे क्रमप्राप्तच आहे. तथापि, समृद्ध गाव स्पर्धेच्या सहाही निकषांत मार्गदर्शनासाठी यांची गरज असतानाही जिल्हास्तरावरील प्रशिक्षण कार्यशाळेतून त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे अभ्यासकच नाहीत, तर प्रशिक्षण आणि मार्गदर्शन झाले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मला निवड झाल्यापासून एकही निमंत्रण नसून फक्त कागदोपत्री आमची नावे वापरली जातात. प्रशासनाचा हा पोरखेळ सुरु आहे. पाण्याच्या बाबतीत वाशिम जिल्ह्याची स्थिती कर्करोगग्रस्तासारखीा असून, उपचार मात्र खरचटल्यासारखे सुरू आहेत. तीन वर्षात प्रशासनाचा आणि गावकºयांचा पैसा-वेळ-श्रमाचा अपव्यव आणि झालेला लाभ याचा ताळेबंद तपासायला पाहिजे. मोठा घोळ उघडीस येईल. आम्हाला हे समजते म्हणून प्रशासन टाळते.
-सचिन कुळकर्णी, जलदूत व जलहक्क कार्यकर्ता


जलसंधारणाचा विषय हा तांत्रिक विषय आहे, मात्र तांत्रिकतेचे प्रशिक्षण देण्यासाठी त्या त्या विषयातल्या तज्ञांना आमंत्रित करण्यात येत नसल्याचे दिसते. याचे आश्चर्य वाटते. जल संधारणाच्या विषयात केवळ पाणी हा केवळ मानव केंद्रित मुद्दा बनवल्या गेला आहे; मात्र पाण्यावर केवळ मानवाचाच हक्क नसून,  मानवासकट संपूर्ण जैवविविधतेचा सुद्धा हक्क आहे या अंगाने विचार करण्याची गरज आहे.
- डॉ. निलेश हेडा, पर्यावरण अभ्यासक, तथा जलनायक , अमरावती विभाग 

Web Title: In the review meeting of Samriddh Gaon competition, there are no water lovers, no water ambassadors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.