पोहरादेवी विकास आराखड्याविषयी आढावा बैठक

By Admin | Updated: June 24, 2017 13:21 IST2017-06-24T13:21:40+5:302017-06-24T13:21:40+5:30

पोहरादेवी विकास आराखडा संदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे.

A review meeting on the Pohdevi development plan | पोहरादेवी विकास आराखड्याविषयी आढावा बैठक

पोहरादेवी विकास आराखड्याविषयी आढावा बैठक

मंगरूळपीर - वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत २५ जून २०१७ रोजी दुपारी ४ वाजता मंगरूळपीर येथील शासकीय विश्रामगृह येथे पोहरादेवी विकास आराखडा संदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग व वन विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पोहरादेवी विकास आराखड्याच्या सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री ना. राठोड घेणार आहेत. पोहरादेवी संस्थानचा सर्वांगीन विकास करण्यासाठी शासनाने कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून विकासात्मक कामे केली जाणार आहेत. त्या दृष्टिकोनातून पालकमंत्री राठोड आढावा घेणार आहेत.

Web Title: A review meeting on the Pohdevi development plan