वाशिम येथे मान्सून पूर्व आढावा बैठक

By Admin | Updated: May 15, 2014 22:44 IST2014-05-15T22:12:39+5:302014-05-15T22:44:35+5:30

जिल्हाधिकारी कुलकर्णी यांच्या अध्य़क्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली.

A review meeting of monsoon at Washim | वाशिम येथे मान्सून पूर्व आढावा बैठक

वाशिम येथे मान्सून पूर्व आढावा बैठक

वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी कुलकर्णी यांच्या अध्य़क्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी नैसर्गिक आपत्तीही अचानक येते. त्यांच्या तीव्रतेचाही आपण अंदाज करु शकत नाही. मात्र अशा कोणत्याही आपत्तीशी लढण्यास सज्ज असल्यावर आपत्तीची तीव्रता कमी करता येते. आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा अत्यंत कडक आहे. या कायद्यानुसार प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा व आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विभागानी याची पूर्तता करण्याचे आवाहन केले. यावेळी लघु पाटबंधारे, कृषी विभाग, आत्मा, आरोग्य विभाग, नगर परिषदा, वीज वितरण कंपनी, प्रादेशिक परिवहन विभागांनी आपला आढावा सादर केला या बैठकीस जिल्हय़ातील सर्व प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे यांनी मानले.

Web Title: A review meeting of monsoon at Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.