शेतकरीविषयक योजनांचा आढावा
By Admin | Updated: January 23, 2016 02:03 IST2016-01-23T02:03:41+5:302016-01-23T02:03:41+5:30
उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे किशोर तिवारी यांचे निर्देश.

शेतकरीविषयक योजनांचा आढावा
वाशिम : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन करीत असलेल्या विविध उपाययोजना व शासकीय योजनांचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केल्या. याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, विभागीय कृषी सहसंचालक सिद्धोधन सरदार, अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, संदीपान सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी ए. आर. खंडागळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, तहसीलदार आशीष बिजवल, अमोल कुंभार, ए. पी. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पठाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.