पाटील यांनी घेतला विकास कामांचा आढावा
By Admin | Updated: February 27, 2015 00:49 IST2015-02-27T00:49:18+5:302015-02-27T00:49:18+5:30
वाशिम जिल्हा आढावा बैठक; पालकमंत्र्यांनी दिल्या समन्वयाच्या सूचना; अखर्चित निधीची घेतली माहिती.

पाटील यांनी घेतला विकास कामांचा आढावा
वाशिम : जिल्हा वार्षिक नियोजन तसेच राज्य व केंद्र सरकारच्या निधीतून जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी सन २0१४-१५ या आर्थिक वर्षात विविध शासकीय यंत्रणांनी राबविलेल्या विकास कामांची व खर्च झालेल्या निधीची माहिती आज २६ फेब्रुवारीला घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एम. जी. वाठ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. पाडेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा कोषागार अधिकारी प्रकाश राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. मिस्कीन, सहकार संस्थांचे उपजिल्हा निबंधक श्री. खाडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे, उपविभागीय अधिकारी अशोक अमनकार, राजेश पारनाईक, तहसीलदार आशिष बिजवल, बी. डी. अरखराव, जनार्दन विधाते, अमोल कुंभार यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, जिल्हा वार्षिक नियोजनमधील अखर्चित निधी खर्च करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही होण्याची गरज आहे. हा निधी खर्च करण्यासाठी काही अडचणी असतील तर त्याबाबत संबंधित विभागाकडून सविस्तर अहवाल मागवून घेण्याच्या सुचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे राबविली जावीत. या अभियानासाठी निवडण्यात आलेल्या जिल्ह्यातील २00 गावांमधील जलसंधारणाची कामे एका वर्षात पूर्ण करायची असल्याने संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले.