रिसोड-मालेगाव मतदारसंघातील विकासकामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST2021-01-17T04:35:15+5:302021-01-17T04:35:15+5:30
रस्ते कामांच्या आढावा सभेला सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावतीचे मुख्य अभियंता प्रशांत नवघरे, सा. बां. मंडळ अकोलाचे अधीक्षक अभियंता ...

रिसोड-मालेगाव मतदारसंघातील विकासकामांचा आढावा
रस्ते कामांच्या आढावा सभेला सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावतीचे मुख्य अभियंता प्रशांत नवघरे, सा. बां. मंडळ अकोलाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सुनील भुतडा, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे पी. आर. खवले, कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, आनंद राजुसकर, उदय भराडे, जवादे, औतकर, राव, भोसले, कांबळे व इतर अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय राजपथ प्राधिकरणमार्फत सुरू असलेल्या वाशिम-अकोला मार्गासह समृद्धी महामार्गाच्या कामावरील जड वाहतुकीमुळे मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील रस्ते क्षतिग्रस्त होत असल्याने सर्व रस्त्यांची तात्पुरती तसेच कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याचे या सभेत ठरविण्यात आले. शिवाय शेतांकडे जाणाºया रस्त्यांसह शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या नुकसानाबाबतही संबंधित यंत्रणेने त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार अमित झनक यांनी दिल्या. त्यानुसार सर्व यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मेडशी ते डव्हा फाटा या १४ किलोमीटर पालखी मार्गाचे काम एप्रिल २०२१पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केल्याची माहिती अकोला सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी यांनी दिली. शिवाय पुरहानी कार्यक्रमातील कामांचे प्रस्ताव, ए.डी.बी. बँक कर्जाचे प्रस्ताव, विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने रस्ते सुरक्षा विषयक बाबींकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना अमरावती सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत नवघरे यांनी सर्व अभियंत्यांना यावेळी दिल्या.