शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अधिकारी बनले ‘गुरुजी’!

By admin | Updated: July 6, 2017 01:17 IST

युवकांना मार्गदर्शन : प्रशासनातर्फे स्पर्धा परीक्षेचा वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाविद्यालयीन युवकांना एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षेविषयी इत्थंभूत माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष कार्यशाळा सुरू केली आहे. या अंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकाऱ्यांनी गुरुजी बनत युवकांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक तथा तहसीलदार आनंद देऊळगावकर, तहसीलदार शीतल वाणी, समाजकल्याण विभागाचे विशेष निरीक्षक अनंत मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शीतल वाणी म्हणाल्या, की स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना आपल्याकडे असलेल्या वेळेचे नियोजन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. वेळेचे नियोजन व्यवस्थित करणे शक्य झाले, तर कमी कालावधीत यश मिळविणे शक्य आहे, अशा शब्दात त्यांनी युवकांना विश्वास दिला. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपले ध्येय निश्चित असणे आवश्यक आहे. आपण कोणत्या पदाच्या परीक्षेला सामोरे जाणार आहोत, हे निश्चित करून त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सर्वसमावेशक पुस्तकांची अभ्यासासाठी निवड करावी. अभ्यासाचा आवाका लक्षात घेऊन वेळेचे चोख नियोजन करणे महत्त्वाचे आहे. तसेच पुस्तक वाचनाबरोबरच दैनंदिन घडामोडींची माहिती घेण्यासाठी वृत्तपत्रे, इंटरनेटचा आवश्यकतेनुसार उपयोग करणेही तितकेच गरजेचे आहे. ग्रुप डिस्कशनमुळे आकलन चांगले होते. मात्र ग्रुपमधील प्रत्येक सदस्य हा स्पर्धा परीक्षा व अभ्यासाचे गांभीर्य जाणणारा असेल, याची खबरदारी घेणेसुद्धा गरजेचे असल्याचे वाणी यांनी स्पष्ट केले.यावेळी तहसीलदार देऊळगावकर म्हणाले, की स्पर्धा परीक्षेचा पर्याय निवडताना अतिशय प्रामाणिकपणे मनापासून तयारी असणे आवश्यक आहे. या परीक्षांसाठी राज्यातून, देशातून लाखो उमेदवार प्रयत्न करीत असतात. त्यामुळे आपल्याला यश मिळवायचे तर खडतर परिश्रम व प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. केवळ इतर लोक सांगतात म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास न करता मनापासून आवड असेल तरच परीक्षेचा पर्याय निवडा. पाया पक्का होण्यासाठी पाचवी ते बारावीपर्यंतच्या पुस्तकांचे वाचन करा. त्यानंतर ज्या परीक्षेला सामोरे जायचे आहे, त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमाला अनुसरून पुस्तकांची निवड करा. वेळेचे नियोजन व प्रामाणिकपणे अभ्यास केला, तर यश निश्चित मिळते, असे देऊळगावकर म्हणाले.