महसुल कर्मचार्‍यांचे लेखनी बंद आंदोलन

By Admin | Updated: July 14, 2014 23:43 IST2014-07-14T23:43:38+5:302014-07-14T23:43:38+5:30

महसुल विभागातील कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आंदोलनातील लेखनी बंदच्या तहसिल कार्यालयातील जनतेची कामे खोळंबली होती.

The revenue movement of the revenue staff is a protest movement | महसुल कर्मचार्‍यांचे लेखनी बंद आंदोलन

महसुल कर्मचार्‍यांचे लेखनी बंद आंदोलन

वाशिम : महसुल विभागातील नायब तहसिलदार, तृतीय श्रेणी व चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आंदोलनातील लेखनी बंदच्या स्वरूपात आज १४ जुलै रोजी चौथा टप्पा पार पडला. परिणामी, तहसिल कार्यालयातील जनतेची कामे खोळंबली होती. १ जुलै २0१४ पासुन महसुल विभागतील अधिकारी व कर्मचार्‍यांनी विविध मागण्या संदर्भात आंदोलनाला प्रारंभ केला. आज आंदोलनाचा चौथा टप्पा होता. या टप्प्यामध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांनी एक दिवस लेखनी बंद आंदोलन केले. या संघटनेचा अखेरचा टप्पा १ ऑगस्ट २0१४ हा आहे. संघटनेच्या मासगण्या मान्य न केल्यास अखेरच्या टप्प्यामध्ये सदर संघटनेने बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेने पुढील प्रमाणे मागण्या शासनाकडे मागितल्या आहेत. नायब तहसिलदार पदाला राजपत्रित अधिकार्‍यांचा दर्जा देण्यात आला असुन ग्रेड पे मात्र वर्ग ३ च्या पदाचा देण्यात आला आहे. त्यामुळे नायब तहसिलदार पदाचा ग्रेड पे वाढवून रूपये ४६00 करण्यात यावा. महसुल विभागातील लिपीकांचे पदनाम बदलून त्याला महसूल सहाय्यक असे पदनाम देण्यात यावे. महसुल विभागातील नायब तहसिलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरण्यात यावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षेत नायब तहसिलदार, तहसिलदार व उपजिल्हाधिकारी पदांसाठी गृह विभागाचे धर्तीवर महसूल खात्यांतर्गत कर्मचार्‍यांसाठी ५ टक्के जागा आरक्षीत ठेवावीत. राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थश्रेणी दर्जा देण्यात यावा. चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना सायकल ऐवजी मोटरसायकल अग्रीम मंजूर करण्यात यावा. या व इतर २६ प्रकारांच्या मागण्या निवेदनामध्ये नमुद आहेत. या आंदोलनामध्ये अरविंद करंगळे, चंद्रकांत भोसले, सुनिल देशमुख, शंकर शिंदे, महादेव शिंदे, विजय खेडकर, भिमराव पट्टेबहाद्दुर, सुभाष चव्हाण, सुनिल घोडे, अनिल घोडे, धनंजय आवटे, दिलिप साळवे, यमुनाबाई अढागळे, अर्चना घोळवे, हर्षदा खेडकर, सचिन मोरे, दिनकर केंद्रे, मारोती खंडारे, म्हात्रे, अशोक डोंगरे, धनंजय कांबळे, वरूरकर, अनिल पडघान, गंगाराम ढोके, मिरा पुरोहीत, रंजना अडकिने, सुधाकर गोडबोले, केशव चव्हाण आदींचा समावेश होता.

Web Title: The revenue movement of the revenue staff is a protest movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.