गौण खनिजातून १६ कोटींचा महसूल !
By Admin | Updated: April 17, 2017 16:35 IST2017-04-17T16:35:05+5:302017-04-17T16:35:05+5:30
शेकडो वाहनांवर कारवाईचा आसूड ओढून महसूल प्रशासनाने १६ कोटी २ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे.

गौण खनिजातून १६ कोटींचा महसूल !
वाशिम - शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरट्या मार्गाने रेती, मुरूम, गिट्टी आदी गौण खनिजाची वाहतुक करणाऱ्या शेकडो वाहनांवर कारवाईचा आसूड ओढून महसूल प्रशासनाने १६ कोटी २ लाख रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या दरम्यानच्या कारवाईचा हा लेखाजोखा आहे.
गौण खनिजाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकजण शासनाची परवानगी न घेता चोरट्या मार्गावर बिनधास्त गौण खनिजाची वाहतुक करीत असल्याचे वास्तव आहे. गौण खनिजाची अवैध वाहतुक रोखण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालय आणि गौण खनिज कार्यालयाचे पथक कारवाई करते. एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या दरम्यान जिल्ह्यात शेकडो वाहनं गौण खनिजाची अवैध वाहतुक करताना पकडण्यात आली.या वाहतुकदारांकडून १६ कोटी २ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात काही प्रमाणात निसर्गसंपदा असल्याने गौणखनिज साठा उपलब्ध आहे. त्यात वाळू, मुरुम, माती, गिट्टी आदींचा समावेश आहे.