आजपासून निर्बंधाची अंमलबजावणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST2021-06-28T04:27:44+5:302021-06-28T04:27:44+5:30

कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नवीन निर्बंधानुसार २८ जून ते १२ जुलैपर्यंत अत्यावश्यक ...

Restrictions enforced from today! | आजपासून निर्बंधाची अंमलबजावणी !

आजपासून निर्बंधाची अंमलबजावणी !

कोरोना विषाणू संसर्गाचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नवीन निर्बंधानुसार २८ जून ते १२ जुलैपर्यंत अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवारी केवळ अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने सुरू राहतील तर इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद राहतील तसेच शनिवारी व रविवारी केवळ पार्सल व होम डिलिव्हरी सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. निर्बंधाची अंमलबजावणी म्हणून प्रशासन पुन्हा अलर्ट झाले असून, प्रमुख चौकात पोलिसांचा बंदोबस्त लावला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी नवीन नियमावलीचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले.

Web Title: Restrictions enforced from today!