मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:44 IST2021-04-28T04:44:45+5:302021-04-28T04:44:45+5:30

यावेळी मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आढाव, सहायक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ...

Restricted area inspection by CEO | मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी

यावेळी मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आढाव, सहायक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मानके, आरबीएसके नोडल अधिकारी डॉ. हेडा, शेंदुरजना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गावंडे, पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भोंगाडे यांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत यांनी पोहरादेवी व शेंदूरजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन तेथील लसीकरण मोहीम, कोरोना चाचण्या याविषयी आढावा घेतला. तसेच शेंदोना येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन तेथील उपाययोजनांची पाहणी केली.

यावेळी पंत म्हणाल्या, ग्रामीण भागातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामस्तरीय समितीचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्याची जबाबदारी या समितीवर आहे. तसेच गावातील एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करून घेणे, लसीकरण मोहिमेसाठी पात्र व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम ग्रामस्तरीय समितीने करावे. कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे तसेच लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Web Title: Restricted area inspection by CEO