भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:41 IST2021-03-19T04:41:18+5:302021-03-19T04:41:18+5:30
रिसोड शहरातील लोणी फाटा येथे केलेल्या आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. कोरोनाविषयक नियमांचे पालन ...

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनाला प्रतिसाद
रिसोड शहरातील लोणी फाटा येथे केलेल्या आंदोलनात भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी करत वीज कंपनीच्या धोरणाचा निषेध नोंदविला. कृषी पंपांची वीज तोडणे तत्काळ थांबवा, सक्तीची वसुली बंद करा, थकीत कृषी पंपांची थकबाकी पूर्णपणे माफ करा, यापुढे कृषी पंपांना मोफत वीज द्या आदी मागण्या करण्यात आल्या. हा लढा असाच सुरू राहील, असे विधान भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी केले. आंदोलनामध्ये शेतकरी अंबादास खरात, भीमराव खोडके, गजानन जाधव, विकास झुंगरे, शंकर हुंबाड, विनोद मवाळ, पंजाब नरवाडे, नागेश शिंदे, गजानन सदार, रामेश्वर सदार, पंडित कुमार सावके, अमर दहीहंडे, पंढरी नरवाडे, जगन देशमुख, विकास आवले, बालाजी बिल्लारी, विष्णू सरकटे, सोनाजी शिंदे, वैजनाथ रंजवे, संतोष भुतेकर, एकनाथ कष्टे, सुनील भुतेकर, संतोष गव्हाणे , रामेश्वर बोरकर, ज्ञानेश्वर खिल्लारे, शंकर आण्णा गुंजकर , पांडुरंग वाघमारे, सीताराम इंगोले , अर्जुन तुरुकमाने, भारत बाजड, राजू खडसे, भागवत बोडखे, विवेक भुतेकर, नितीन गाडे, सचिन काकडे, किशोर लाड, पवन खोंडकर, शंकर इंगोले, रजनीश खोंडकर, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.