ऑनलाइन कार्यशाळेस शिरपूर येथे प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST2021-09-13T04:40:55+5:302021-09-13T04:40:55+5:30
अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. डब्ल्यू.के. पोकळे होते. मूर्तिकार राजेश खंदारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीचा वापर करून ...

ऑनलाइन कार्यशाळेस शिरपूर येथे प्रतिसाद
अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. डब्ल्यू.के. पोकळे होते. मूर्तिकार राजेश खंदारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीचा वापर करून गणपतीची मूर्ती साध्या व सोप्या पद्धतीने बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी डाॅ. सीमित रोकडे, प्रा. डाॅ. स्मिता लांडे, प्रा. व्ही.एन. लोहिया, प्रा. शिवाजी शेंडे, प्रा. अपूर्व गुप्ता यांनी पुढाकार घेतला.
................
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे स्टाॅल
वनस्पती शास्त्र व ईको क्लबच्या वतीने पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींचे स्टाॅल लावण्यात आले. ना नफा ना तोटा, या तत्त्वावर मूर्तींची विक्री करण्यात आली.
..............
‘सेल्फी विथ बाप्पा’ स्पर्धेचे आयोजन
शाडू मातीचा वापर करून बनविलेल्या गणेशमूर्तीसोबत सेल्फी काढण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्यांचे फोटो परीक्षकांद्वारे निवडले जातील, त्यांना महाविद्यालयातर्फे आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.