‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:30+5:302021-07-10T04:28:30+5:30
वाशिम येथे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, ...

‘लोकमत रक्ताचं नातं’ मोहिमेस प्रतिसाद
वाशिम येथे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. डॉ. अविनाश आहेर, डॉ. विनोद वानखडे, अमोल कापसे आदींनी रक्तदान करून शिबिराला प्रारंभ केला. विस्तार अधिकारी तुषार जाधव यांनी सपत्नीक रक्तदान केले. यावेळी शासकीय रक्तपेढीचे माेलाचे याेगदान लाभले. मंगरूळपीर येथे भाजपचे प्रदेश प्रतिनिधी, नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे, वीज कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मिसाळ, नंदलाल पवार, ध्यास संपर्कप्रमुख अश्विनी अवताडे, सचिन कुळकर्णी, नगरसेवक सचिन पवार, संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष सचिन मांढरे, प्रमोद घोडचर, नरेश ठाकूर, प्रशांत कळवे, प्रमोद पाटील, उमेश राठोड, भास्कर मुळे, रामा ठणठणकार, रामदास मोरे आदींची उपस्थिती होती. तसेच शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग - १, डॉ. एल. एन. चव्हाण, डॉ. श्रीकांत जाधव, डॉ. रमेश आडे, शरद गावंडे, प्रकाश संगत, तर शासकीय रक्तपेढी, वाशिमचे डॉ. फुपाटे, सचिन दंडे, संदीप मोरे, लक्ष्मण काळे, अविनाश अवसारे यांनी सहकार्य केले.
................
कर्मचारी संघटनांचे परिश्रम फळास !
वाशिम येथे जिल्हा परिषद सभागृहात आयाेजित रक्तदान शिबिरात अधिकाधिक संख्येने रक्तदान व्हावे, याकरिता कर्मचारी संघटनांचे नानाभाऊ तुर्के, अमोल कापसे, गजानन खुळे, राजेश भारती यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन ५२ जणांचे रक्तदान घडवून आणले. यावेळी अधिकारी, पदाधिकारी यांनीसुध्दा काैतुक केले.
...............
आज येथे शिबिर
शिवाजी हायस्कूल, रिसाेड
रिसाेड : शिवाजी हायस्कूल, रिसाेड येथे सकाळी ११ वाजता रितसर शिबिराचे उद्घाटन करून शिबिरास सुरुवात करण्यात येणार आहे. या शिबिरात तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, आराेग्य विभाग, पाेलीस स्टेशन, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी सहभागी हाेत असून, भारतीय स्टेट बॅंकेनेही सहभाग दर्शविला आहे.
वाशिम : संत निरंकारी सत्संग भवन, लाखाळा राेड, वाशिम
शेलुबाजार : साई मंदिर, अकाेला राेड
................
खा. गवळी यांची भेट
वाशिम येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात ९ जून राेजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला खा. भावना गवळी यांनी भेट देऊन ‘लाेकमत’तर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लाेकमत रक्ताचं नातं’ या माेहिमेचे काैतुक केले. यावेळी त्यांच्यासाेबत शिवसैनिक उपस्थित हाेते.
.............
सात महिलांचाही पुढाकार
रक्तदान शिबिरामध्ये महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. वाशिम येथील जिल्हा परिषद सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये सामान्य प्रशासन विभागातील नीता पांडुरंग डाखाेरे, श्वेता प्रशांत अढाऊ, अर्चना तुषार जाधव, स्मिता जगन्नाथ गावंडे, वंदना विकास मिसाळ, सुरेखा विजय निशाडे, तर मंगरूळपीर येथे स्वाती गजानन राऊत यांनी रक्तदान केले.
...........
शिबिराचे वेळापत्रक
११ जुलै - पंचायत समिती, कारंजा, ११ जुलै - गोटे ॲडव्हान्स स्कीन क्लिनिक, वाशिम, ११ जुलै - बांडे कोचिंग क्लासेस, मंत्री पार्क, वाशिम. १२ जुलै शिरपूर जैन येथे रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.
............