कर्तृत्वान महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST2021-03-22T04:37:48+5:302021-03-22T04:37:48+5:30

वाशिम : शहरातील गोंदेश्वर परिसरातील ज्येष्ठ व कर्तुत्वान महिलांचा प्रगती महिला बचत गटाच्या वतीने शुक्रवारला छोटेखानी सत्कार करण्यात आला. ...

Respect for hardworking women | कर्तृत्वान महिलांचा सत्कार

कर्तृत्वान महिलांचा सत्कार

वाशिम : शहरातील गोंदेश्वर परिसरातील ज्येष्ठ व कर्तुत्वान महिलांचा प्रगती महिला बचत गटाच्या वतीने शुक्रवारला छोटेखानी सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुका शिक्षण समितीचे अध्यक्ष रामा इंगळे, बचत गटाच्या अध्यक्ष वंदना रामा इंगळे, गुंफाबाई मडके या मान्यवरांच्या हस्ते मंचावर गौरव करण्यात आला. गौरव करण्यात आलेल्या महिलांमध्ये शशिकलाबाई नथ्थुजी इंगळे, चंद्रभागाबाई सखाराम पिंजरकर, लक्ष्मीबाई ठेंगडे, पार्वतीबाई गणपत काळे, राधाबाई नारायण काळे, गीताबाई बाबूजी बळी, शांताबाई तळणकर, रूख्माबाई गणपत जहिरव, ह.भ.प. सागर महाराज यांच्या मातोश्री, त्रिवेणीबाई संगवार, सुबाबाई वानखेडे, आनंदाबाई ठेंगडे, गुंफाबाई भालेराव, शोभाबाई भालेराव, अण्णपुर्णा भांदुर्गे, मथुराबाई वानखेडे, चंद्रभागाबाई गाभने, शकुंतलाबाई शिंदे, कौशल्याबाई खोटे, मथुराबाई ढवळे, छबाबाई पूरी, नर्मदाबाई इंगोले, अनुसया इंगोले, अंजनाबाई इंगोले यांच्यासह गोंदेश्वर परिसरातील इतर महिलांचा बचत गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: Respect for hardworking women