शेतक-यांचा पळस वृक्ष रक्षणाचा संकल्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 20:12 IST2017-08-17T20:10:30+5:302017-08-17T20:12:30+5:30

वाकद : रिसोड तालुक्यातील बाळखेड येथील शेतकºयांनी पोळा सण पर्यावरण पुरक पद्धतीने साजरा करण्याचा एकमताने संकल्प केला. या अनुषंगाने बाळखेड येथील समस्त कास्तकाराने मेढी म्हणून वापरण्यात येणारे पळसाचे झाड न तोडण्याचा संकल्प केला. 

Resolve the protection of palm tree | शेतक-यांचा पळस वृक्ष रक्षणाचा संकल्प  

शेतक-यांचा पळस वृक्ष रक्षणाचा संकल्प  

ठळक मुद्देबाळखेड येथे बैठकपोळा पर्यावरणपुरक पद्धतीने साजरा होणार 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाकद : रिसोड तालुक्यातील बाळखेड येथील शेतकºयांनी पोळा सण पर्यावरण पुरक पद्धतीने साजरा करण्याचा एकमताने संकल्प केला. या अनुषंगाने बाळखेड येथील समस्त कास्तकाराने मेढी म्हणून वापरण्यात येणारे पळसाचे झाड न तोडण्याचा संकल्प केला. 
आगामी पोळा सणाच्या पृष्ठभूमीवर पर्यावरण रक्षण करण्याच्या उद्देशाने पर्यावरण शिक्षक गजानन मुलंगे यांनी बाळखेड येथे एका बैठकीचे आयोजन गुरुवारी केले. यामध्ये मालती इंगोले, सरपंच ग्रा. पं. बाळखेड, शिवाजीराव अवताडे सदस्य पं. स. रिसोड, बि.के. उबाळे सहा. लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग रिसोड आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. या बैठकीत  मुलंगे यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पळस हा बहुपयोगी वृक्ष असून भारत, मॅनमार आणि श्रीलंका येथे सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतो. पळसापासून द्रोण व पत्रावळी तयार करतात एवढाच काय तो उपयोग जनसामान्यांना माहित आहे; परंतु पळसाचे त्याशिवाय अनेक  फायदे आहेत, हे विसरुन चालणार नाही. हत्ती, शेळी आणि म्हशी सारखे अनेक पाळीव प्राणी पळसाचीच पाने आवडीचे खातात. पळसाचे खोड, साल आणि मुळापासून उत्तम दर्जाचा कायद तयार होतो. बाभळीच्या झाडाप्रमाणे पळसापासूनसुद्धा डिंक मिळतो. त्या डिंकाला लाख म्हणून उपयोगात आणल्या जाते. पूर्वीच्या काळी पळसाच्या मुळाच्या सालीपासून तयार करण्यात आलेल्या दोरीचा उपयोग कास्तकार शेती कामासाठी करीत असत. जुन, जुलै महिन्यात येणाºया पळसाच्या चपट्या शेंगाच्या उपयोग देशी व आयुर्वेदीक औषधीमध्ये करतात. १९७५ सालापासून थर्माकॉलच्या पत्रावळ््या आणि द्रोण तयार करण्याचे कारखाने सुरु झाल्यापासून पळसाची उपयोगिता संपुष्टात आलीआणि त्याची सर्रास कत्तल सुरु झाली. भरीस-भर म्हणून पोळ््याच्या सणालासुद्धा पळसाची एक, दोन फांदी न आणता रुढी पंरपरेनुसार पळसाची झाडे तोडून घरापुढे उभे करण्यात येतात यामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉ. विजय ढोले यांनी पळसाची उपयोगिता व संवर्धन याबाबत जनजागृतीपर बाळखेड, वाकद आणि रिसोड येथे दोन हजार पत्रके वितरीत केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजय गायकवाड, तर आभार सचिन पºहाड यांनी मानले. 

Web Title: Resolve the protection of palm tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.