निवासी शाळांना मिळणार तासिका तत्त्वावर शिक्षक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:09 IST2017-08-18T01:08:49+5:302017-08-18T01:09:45+5:30

वाशिम: जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयाच्या अधिनस्त निवासी शाळांमध्ये रिक्त असलेली शिक्षकांची पदे तासिका तत्त्वावर भरली जाणार असून, ५४ रुपये प्रतितास याप्रमाणे त्यांना मानधन दिले जाणार आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाने बुधवारी कळविली.

Residential schools will get teachers on hourly basis! | निवासी शाळांना मिळणार तासिका तत्त्वावर शिक्षक!

निवासी शाळांना मिळणार तासिका तत्त्वावर शिक्षक!

ठळक मुद्देसमाजकल्याण विभागप्रतितास ५४ रुपये मानधन

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयाच्या अधिनस्त निवासी शाळांमध्ये रिक्त असलेली शिक्षकांची पदे तासिका तत्त्वावर भरली जाणार असून, ५४ रुपये प्रतितास याप्रमाणे त्यांना मानधन दिले जाणार आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाने बुधवारी कळविली.
सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्या अधिनस्त रिसोड तालुक्यातील सवड येथील अनुसूचित जाती मुलांच्या शासकीय निवासी शाळेत २0१७-१८ या शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ६ वी ते ८ वीसाठी तासिका तत्त्वावर दोन व इयत्ता ९ ते १0 साठी दोन अशा चार शिक्षकांची आवश्यकता आहे, तसेच मंगरूळपीर तालुक्यातील तुळजापूर येथील अनुसूचित जाती मुलांच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ९ ते १0 करिता तीन व वाशिम तालुक्यातील सुरकुंडी येथील अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६ वी  ते ८ वी करिता एक व इयत्ता ९ ते १0 करिता एक अशा दोन शिक्षकांची आवश्यकता आहे. तथापि, ही पदे तासिका तत्त्वावर भरली जाणार असून, शिक्षकांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात सहा महिन्यांकरिता असणार आहे. त्यांना प्रतितास ५४ रुपये मानधन अनु™ोय राहील. 
इच्छुक व पात्र डी.एड., बी.एड. अर्हताधारक उमेदवारांनी २१ ऑगस्ट २0१७ रोजी  सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नालंदा नगर, वाशिम येथे सकाळी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, वाशिम यांनी केले आहे.

Web Title: Residential schools will get teachers on hourly basis!