चार महिन्यांत प्रकल्पांतील साठा ६० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:36+5:302021-02-05T09:26:36+5:30
वाशिम जिल्ह्यात पावसाच्या अनियमिततेचा फटका सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वारंवार सहन करावा लागतो. गतवर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक झाल्याने शेतकऱ्यांना ...

चार महिन्यांत प्रकल्पांतील साठा ६० टक्क्यांवर
वाशिम जिल्ह्यात पावसाच्या अनियमिततेचा फटका सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वारंवार सहन करावा लागतो. गतवर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला असला तरी, सर्वच प्रकल्प काठोकाठ भरले. त्यात ३० सप्टेंबरपर्यंतच पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ११ बॅरेजेस, १२२ लघू प्रकल्प आणि ३ मध्यम प्रकल्पांत मिळून ९३ टक्क्यांहून अधिक जलसाठा झाल्याने पाणीटंचाईची समस्या मिटल्याचे दिसू लागले; परंतु आता अवघ्या चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला नसतानाच जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत मिळून सरासरी केवळ ६१ टक्के उपयुक्त साठा उरला आहे. सद्यस्थितीत उन्हाचा पारा वाढला नसतानाही प्रकल्पांची पातळी निम्म्यावर आली आहे. त्यात अद्यापही सिंचनासाठी उपसा सुरू असून, पुढे तापमानात वाढ झाल्यानंतर प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
-----------
१३ प्रकल्पांची पातळी ३० टक्क्यांच्या आत
जिल्ह्यातील मध्यम, लघू प्रकल्पांसह बॅरेजेस मिळून सरासरी ६१ टक्के उपयुक्त साठा असला तरी, त्यातील १३ प्रकल्पांत ३० टक्केही उपयुक्त साठा उरलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असलेल्या गावांत येत्या एक दोन महिन्यांतच पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांत पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनाही तातडीने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
---------
मध्यम प्रकल्पांवरील योजनांना धोका नाही
जिल्ह्यात वाशिम, मालेगाव आणि कारंजा तालुक्यात प्रत्येकी एक मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पातून वाशिम, कारंजा या शहरांसह ग्रामीण भागांतील पाणी पुरवठा योजना राबविल्या जातात. तथापि, या तिन्ही प्रकल्पांत पुरेसा उपयुक्त साठा असल्याने तूर्तास तरी या प्रकल्पातून राबविल्या जाणाऱ्या योजनांना धोका नाही. पुढील वर्षी मात्र अपुरा पाऊस पडल्यास स्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----------
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची स्थिती
प्रकल्प ३० सप्टेंबर २८ जानेवारी
एकबुर्जी १०० टक्के ५८. ७७
सोनल १०० टक्के ६४.७०
अडाण १०० टक्के ७५.१०
---------------------------------
लघू प्रकल्पांची स्थिती
प्रकल्प ३० सप्टेंबर २८ जानेवारी
१३३ ९३ टक्के ६१ टक्के
-----------
पावसाळ्यात झालेला पाऊस
अपेक्षित प्रत्यक्ष सरासरी
७४९.०८ ७८१.२० १०४.२०
===Photopath===
280121\28wsm_1_28012021_35.jpg
===Caption===
चार महिन्यांत प्रकल्पांतील साठा ६० टक्क्यांवर