आक्रोश आंदोलन

By Admin | Updated: October 2, 2014 01:26 IST2014-10-02T01:26:02+5:302014-10-02T01:26:02+5:30

अनसिंग येथील बेघर नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन.

Resentment movement | आक्रोश आंदोलन

आक्रोश आंदोलन

वाशिम : अतिक्रमण हटाव मोहिमेतून संसार उघड्यावर आलेल्या कुटुंबांचा सर्वे करुन निवारा देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील अनसिंग येथील बेघर नागरिकांनी १ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन छेडण्यात आले.
अनसिंग येथे अतिक्रमण हटाव मोहीम गत काही महिन्यांपूर्वी राबविण्यात आली होती. या मोहिमेतून गोरगरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर आले होते. राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी बेघर कुटुंबाने जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा केली होती. मात्र या मागणीची दखल घेत नसल्याचे पाहून १ ऑक्टोबर रोजी बेघर कुटुंब आणि मानवी हक्क सुरक्षा दल या सामाजिक संघटनेच्यावतीने आक्रोश आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आले.
यावेळी घरे पाडल्यामुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबांचा महसुल विभागाच्यावतीने सर्वे करण्यात यावा, राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, बेघर कुटुंबांचे पुनर्वसन करावे किंवा शासकीय योजनेतून घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या.

Web Title: Resentment movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.