शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

स्थलांतरीत मजूरांना ‘फूड किट’ देण्याच्या अंमलबजावणीसाठी मागितली ४ आठवड्यांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 12:30 PM

त्याची अंमलबजावणी झाली नसून २६ मे रोजी शासनाने ४ आठवड्यांची मुदत मागितल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गच्या भीतीपोटी राज्यभरात लाखो मजुर, कामगार स्थलांतरित झाले आहेत. त्यांच्यापैकी बहुतांश लोकांकडे ना आधारकार्ड आहे ना राशनकार्ड. अशा लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ, एक किलो तूर डाळ, एक किलो चना डाळ, एक किलो साखर, एक किलो खाण्याचे तेल व २५० ग्रॅम चहापत्तीचा समावेश असलेली ‘फूड किट’ द्यावी, असा अंतरिम आदेश मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १२ मे रोजी दिला; मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसून २६ मे रोजी शासनाने ४ आठवड्यांची मुदत मागितल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली.यासंदर्भात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सचिव संजय धर्माधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार, त्यावर न्यायमुर्ती माधव जमादार यांनी १२ मे २०२० रोजी अंतरिम आदेश पारित करून शिधापत्रिका अथवा आधारकार्ड नसलेल्या गरजू लाभार्थींनाही दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ, एक किलो तूर डाळ, एक किलो चना डाळ, एक किलो साखर, एक किलो खाण्याचे तेल व २५० ग्रॅम चहापत्तीची किट उपलब्ध करून देण्याबाबत शासनाला निर्देशित केले होते.जिल्हास्तरातील ‘डिस्ट्रीक्ट मिनरल फाऊंडेशन’कडे असलेल्या निधीतून त्याची तरतूद करावी, असेही न्यायमुर्ती जाधव यांनी शासनाला सुचविले.गरजवंतांचा तत्काळ सर्वे करून तशी यादी तयार करावी आणि संबंधितांना फूड किट पुरवावी, असेही अंतरिम आदेशात नमूद करण्यात आले आहे; मात्र शासनाने या महत्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, २६ मे रोजी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी घेण्यात आली, तेव्हा शासनाने ४ आठवड्यांची मुदत मागितली. त्यानुषंगाने जिल्हास्तरावरही हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.कोरोनाच्या संकटकाळात राज्यभरातील लाखो मजूर भितीपोटी आपापल्या गावी परतले आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून ते ज्याठिकाणी कामाला होते, तो रोजगार हिरावला गेला. यासह आता हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. अशा स्थितीत शासनाने आधारकार्ड किंवा राशनकार्डची सक्ती न करता संबंधितांना ‘फूड किट’ पुरविणे आवश्यक आहे. शासनाने यासाठी ४ आठवड्यांची मुदत मागितली असून प्रश्न मार्गी लागेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही.- संजय धर्माधिकारीयाचिकाकर्ते तथा सचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भप्रांत, नागपूर

 

टॅग्स :washimवाशिमHigh Courtउच्च न्यायालय