प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:47+5:302021-01-13T05:45:47+5:30
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक प्रशांत जाधव, पोलीस निरीक्षक ...

प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीचा आढावा
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक प्रशांत जाधव, पोलीस निरीक्षक श्रीराम घुगे, राखीव पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हिंगे म्हणाले, २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा होणार आहे. त्यामुळे सकाळी ८.३० वाजल्यानंतर व सकाळी १० वाजण्यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था यांनी ध्वजारोहणचा कार्यक्रम आयोजित करू नये. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थिती मर्यादित स्वरूपात राहणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोनाविषयक सूचनांचे पालन होणे आवश्यक असून या अनुषंगाने सोपविण्यात आलेली जबाबदारी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजित वेळेत पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.