बेकायदेशीर गर्भपाताची माहिती द्या, एक लाख रुपये मिळवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST2021-08-15T04:41:20+5:302021-08-15T04:41:20+5:30
गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान तंत्र कायदा व बेटी बचाओ, बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. ...

बेकायदेशीर गर्भपाताची माहिती द्या, एक लाख रुपये मिळवा
गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान तंत्र कायदा व बेटी बचाओ, बेटी पढाओ कार्यक्रमांतर्गत गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. त्याचे उल्लंघन करणारे केंद्र अथवा व्यक्ती दोषी असल्याचे मानून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची कायद्यात तरतूद आहे. दरम्यान, जिल्ह्यात कुठेही बेकायदेशीर पद्धतीने गर्भपात होत असल्याबाबत माहिती देणाऱ्या खबऱ्यांना शासनामार्फत बक्षीस देण्यात येईल. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत अवैधरीत्या गर्भपात किंवा गर्भलिंग चाचणी होत असेल तर १८००२३३४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर कळवावे. तसेच डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डाॅट आमची मुलगी डाॅट ईन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी.
तक्रारीची खातरजमा होऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती देणाऱ्यास शासनाद्वारे खबरी बक्षीस योजनेतून एक लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येईल. विशेषत: संबंधितांचे नावदेखील गोपनीय राखले जाईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी कळविले आहे.